आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Ambassador Nancy Powell To Meet Narendra Modi News In Marathi

अखेर अमेरिका मवाळ, नरेंद्र मोदी-नॅन्सी पॉवेल उद्या भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/वॉशिंग्टन- अमेरिकेचा 9 वर्षांपासूनचा नरेंद्र मोदीविरोध अखेर मावळला आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल 13 फेब्रुवारीला अहमदाबादेत नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

मोदी यांनी पॉवेल भेटीची विनंती स्वीकारली असून, गुरुवारीच ती होऊ शकते. 2002 गुजरात दंगलींमुळे अमेरिकेने मोदींशी संपर्क ठेवण्यास नकार देत 2005 पासून व्हिसा नाकारला. यापूर्वी अमेरिकी दूतावासाच्या अधिकार्‍यांनी गुजरातच्या अधिकार्‍यांची भेट घेतली होती. यात दंगलींबाबतची चर्चा झाल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात या भेटीने मोदी-पॉवेल यांच्यात चर्चेची पार्श्वभूमी तयार केली. ओबामा सरकारने विविध विभागांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला. निवडणुकीत मोदी सरस ठरण्याचा निष्कर्ष अमेरिकेतील बैठकांत निघाला. ते सत्तेवर आल्यास व्यापार व इतर मुद्दय़ांवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्याशी सलगी साधण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत.