आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Approved Sale Of Eight F 16 To Pakistan Latest News In Marathi

पाकिस्तानाला आठ F-16 फायटर जेट विकणार अमेरिका, भारताचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/नवी दिल्ली- अमेरिकेचे डिफेंस हेडक्वार्टर्स पेंटॅगॉनने पाकिस्तानला आठ एफ-16 फायटर विक्रीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 70 कोटी डॉलर्सच्या डीलनुसार, अमेरिका पाकिस्तानला लॉकहीड मार्टिन ग्रुपच्या आठ फायटर प्लेनसोबत रडार व इतर इक्विपमेंट्स उपलब्ध करून देणार आहे. कोणत्याही हवामानात शस्त्रूवर हल्ला करण्‍याची क्षमता या फायटर प्लेनमध्ये आहे.

दुसरीकडे, बराक ओबामा प्रशासनाच्या या निर्णययावर भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. दिल्लीतील अमेरिकेच्या राजदूताला बोलावून त्यांच्याकडे भारत सरकारने नाराजी व्यक्त केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचे रेकॉर्ड खराब...
- परराष्‍ट्र मंत्रालयाने सांगितले, की पाकिस्तानाचा जुना इतिहास पाहात, त्याचे रेकॉर्ड खराब आहे. अमेरिकेने पाकला अशा प्रकारचे लष्करी सहाय्य करणे चुकीचे असल्याचे सांगत, भारत सरकारने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
- दुसरीकडे, पेंटॅगॉन डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीने या डीलला मंजुरी दिली आहे.
- एजन्सीने सांगितले की, पाकिस्तान स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी फायटर जेट खरेदी करत आहे. पाकिस्तान स्वरक्षणासाठी फायटर जेटचा वापर करणार आहे. फायटर जेटच्या माध्यमातून पाक काउंटर टेररिझम ऑपरेशन्स आणखी धारदार बनवणार आहे.
- अमेरिकेच्या रिपब्लिकन व डेमोक्रॅट असा दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतरही ओबामा सरकारने हा निर्णय घेतला आहे.अमेरिकन काँग्रेसने या डिलला हिरवा कंदील दाखवण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
- अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणानुसार, दक्षिण आशियामधील प्रमुख देशापैकी पाकिस्तानही एक देश आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार आहे. पाकची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ओबामा सरकार स्पष्ट केले आहे.
- या डीलमुळे प्रांता-प्रांतातील लष्करी संतुलन ढासाळणार नाही, याची विशेष काळजी घेतल्याचे ओबामा सरकारने स्पष्ट केले आहे.
- पाकिस्तानला दहशतवादी व घुसखोरांशी दोन हात करण्याच्या अटीवरच या डीलला मंजुरी देण्यात आल्याचे अमेरिकेच्या सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, भारत-पाक-चीनची हवाई सामर्थ्य...