आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदलांवर अमेरिकेची निगराणी : सीताराम येचुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारत-अमेरिकेतील लष्करी भागीदारी करारामुळे देशाची सैन्य दले आणि संरक्षण साहित्य विश्लेषणासाठी खुली आणि अमेरिकेच्या नियंत्रणात जातील. त्यामुळे भारत अमेरिकेच्या अंकित होऊ शकेल, असा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.

भारताला अमेरिकेचा मेजर डिफेन्स पार्टनर असा दर्जा अमेरिकेने देताना नक्की काय काय अटी आहेत तसेच हे सर्व नियमाने संरक्षण नीतीनुसार झालेय का, याविषयी पंतप्रधानांनी संसदेत खुलासा करावा, अशी मागणी सीताराम येचुरी यांनी पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
याबाबत यूएसने सिनेटला तसेच बाहेरही काहीही तपशीलवार सांगितलेले नाही आणि नरेंद्र मोदींनीही याबाबत संसदेत या महत्त्वपूर्ण सौद्याबद्दल कुठलीही माहिती दिली नाही वा विधान केलेले नाही.
देशाने यूएसची बाजू २०१७ च्या नॅशनल डिफेन्स अॅथॉरायझेशन अॅक्ट (एनडीएए)च्या वाचनातून आकलनातून जाणली आहे; पण इतर बाबींवरील अज्ञान वा भारतीय कमिटमेंट तसेच भारताला अमेरिकेचा मेजर डिफेन्स पार्टनर बनविण्याबाबत काय चालले आहे, ते समोर वा सदनाच्या पटलावर स्पष्टपणे यायला हवे, असे सीपीआय(एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...