आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Demand No Fly Zone On Rajpath On 26 Jan Read News At Divya Marathi

प्रजासत्ताक दिन : राजपथला \' नो फ्लाय झोन\' घोषित करण्यास भारताचा अमेरिकेला नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येणार आहेत. या दरम्यान त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणा-या अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने भारताला प्रजासत्ताक दिनी राजपथाला 'नो फ्लाय झोन' म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
ओबामांच्या भारत दौ-यापूर्वी अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा राजपथावरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात आली होती. यावेळी या यंत्रणेने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राजपथवरून विमानांच्या उड्डाणास परवानगी न देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अमेरिकेतर्फे करण्यात आलेली ही मागणी भारताने फेटाळली असून विमानांचे उड्डाण रद्द केल्यास या दिवशी होणारा पारंपरिक फ्लाय-पास्ट कार्यक्रमदेखील रद्द करावा लागेल असे सांगण्यात आले आहे. असे करणे शक्य नसल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
25 ते 27 जानेवारीदरम्यान बराक ओबामा भारत दौ-यावर येणार आहेत. यामध्ये ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाललादेखील भेट देणार आहेत.