आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Based Muslim Outfit Upload Muzaffarnagar Roit Video

मुजफ्फरनगर दंगल म्हणजे दुसरे \'गुजरात\'च, मुस्लिम संघटनेने अपलोड केला व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुजफ्फरनगर दंगलीवरून आता राजकीय कट-कारस्थाने रचण्याची तयारी जोरदार सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे (आरएसएस) 'मुजफ्फरनगर दंगल' शीर्षकाचे एक मॅगझीन वाटल्यानंतर आता एका मुस्लिम संघटनेद्वारे 'मुजफ्फरनगर ब्लीड' नावाचा एक व्हिडिओ अपलोड केल्याची बाब पुढे आली आहे. अमेरिकास्थित इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊन्सिलने (आयएएमसी) मुजफ्फरनगर दंगलीवर प्रकाशझोत टाकणारा तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये मुजफ्फरनगर दंगल म्हणजे 2002 मधील गुजरात दंगलीची पुनरावृत्ती असल्याचे म्हटले आहे. मुस्लिमांच्या हत्येबाबत यूपीतील हिंदू जाट जातींच्या लोकांना जबाबदार धरले आहे. 'आयएएमसी' ही अमेरिकेत भारतीय मुस्लिमांची संघटना आहे.
हा व्हिडिओ एक जानेवारीला यूट्यूबवर तसेच अनेक प्रोमुस्लिम साईट्सवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देशभर पसरविण्याची 'आयएएमसी'ची योजना आहे. व्हिडिओची सुरुवात जळत असलेली घरे दाखवून केली आहे. यात दंगलीतील कथित पिडीतांची वक्तव्ये आहेत. या व्हिडिओत दावा केला गेला आहे, की मुजफ्फरनगर दंगलीत 97 मुस्लिमांसह एकून 113 लोक मारले गेले. किमान 25 गावांतील मुस्लिमांना घर सोडण्यास भाग पाडल्या गेले आहे.
पुढे वाचा, काय दाखवले आहे या व्हिडिओत...