आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा... कसा आहे जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब? डोनाल्ड ट्रम्प यांनी शब्द खरा केला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/काबुल- 'मी अध्यक्ष झालो तर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सर्वात मोठा शक्तिशाली बॉम्ब टाकेन.', असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात वक्तव्य केले होते. अमेरिकेने गुरुवारी अफगाणिस्तानात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ट्रम्प यांनी शब्द खरा केल्याची सर्वत्र चर्चा आहे.

अमेरिकेने काल (गुरुवारी) सायंकाळी अफगाणिस्तानातील नानागडमध्ये जहाल दहशतवादी संघटना आयएसआयएसविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. दहशतवाद्यांची तळे उद्‍ध्वस्त करण्‍यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात मोठा 10 हजार किलोंचा अणुरहीत बॉम्बचा वापर केला. सीरियात अमेरिकेद्वारा टाकण्यात आलेल्या आलेल्या बॉम्बच्या तुलनेत हा बॉम्ब 21 पटीने जास्त वजनदार आहे. या बॉम्बला ‘मदर ऑफ बॉम्ब’ संबोधले जाते. अफगाणिस्तानात गुहांमध्ये लपलेल्या सुमारे 7 हजार आयएसआयएसच्या दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई केली आहे.

शक्तिशाली बॉम्ब टाकून अमेरिकेने घेतला एका जवानाच्या मृत्यूचा बदला...
आपल्या एका जवानाच्या मृत्यूच्या बदल्यात हा हल्ला केल्याचा अमेरिकेने दावा केला आहे. हा जवान गेल्या शनिवारी अतिरेक्यांविरोधातील कारवाईत शहीद झाला होता. हल्ला झालेले ठिकाण पेशावरपासून 100 किमी अंतरावर आहे. यात 18 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...कसा आहे जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...