आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपुआ सरकारचा आणखी एक संरक्षण व्यवहार घोटाळा उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अगस्ता वेस्टलँड प्रकरण मानगुटीवर असतानाच आता पुन्हा तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारचा एक संरक्षण घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. संपुआ सरकारच्या काळातील हजार ३८७ कोटींचा आणखी एक संरक्षण व्यवहार वादात अडकला आहे. ब्राझीलच्या एका वर्तमानपत्रानुसार, तीन ईएमबी-१४५ जेट विमानांच्या विक्री प्रकरणात मध्यस्थाला लाच दिल्याप्रकरणी अॅम्ब्रायर ही ब्राझीलची विमान उत्पादक कंपनी आरोपांत अडकली आहे. ब्राझील आणि अमेरिकेतील विधी मंत्रालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) कंपनीकडून १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागवले आहे. कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.
संपुआ काळातील व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यानंतर हा दुसरा घोटाळा आहे. अॅम्ब्रायर कंपनीशी भारताने २००८ मध्ये साैदा केला होता. या कंपनीकडून डीआरडीओने हजार ५२० कोटींच्या एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम योजनेसाठी जेट विमान घेतले होते. डीआरडीओने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यातच या तिन्ही विमानांना या प्रकल्पात कार्यरत केले आहे.
अमेरिकेकडून २०१० पासून चौकशी सुरू
ब्राझीलमधील “फोल्हा डे साओ पावलो’ या वृत्तपत्रानुसार, डॉमिनिक प्रजासत्ताकासोबत झालेल्या या करारातील संशयावरून अमेरिकेने २०१० पासूनच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नंतर त्यांनी यात भारत आणि सौदी अरेबियासह अन्य देशांशी झालेल्या कराराचाही या चौकशीत समावेश करून घेतला. या करारासाठी अॅम्ब्रायरने लाच घेतली काय? याची चौकशी अमेरिकेच्या विधी मंत्रालयाकडून सुरू आहे. ब्रिटनमधील एका भारतीय व्यावसायिकाने या कंपनीसाठी मध्यस्थाची भूमिका निभावल्याची शंका आहे. या मध्यस्थाशी झालेल्या कराराची प्रत ब्रिटनमध्ये सुरक्षित असून त्याचे अधिकार ब्राझीलची कंपनी आणि अन्य मध्यस्थाकडे असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.
वृत्तपत्रातील माहितीनुसार, अॅम्ब्रायर कंपनी अमेरिकेच्या चौकशी समितीला पूर्ण सहकार्य करत असून शिक्षेसाठीही तयार आहे. इतकेच नव्हे तर संभाव्य दंडापोटी १३३३ कोटींची रक्कमही त्यांनी वेगळी काढून ठेवली आहे. वृत्तपत्राने अॅम्ब्रायरचे डिफेन्स सेल्स मॅनेजर अल्बर्ट फिलिप यांच्या हवाल्याने सांगितले की, अमेरिकेच्या सर्व्हिलान्स सिस्टिम विक्रीच्या करारात मदतीसाठी कंपनीच्या एका व्यक्तीशी संपर्क करण्यात आला होता, असे युराेपमध्ये तैनात कंपनीच्या माजी विक्री संचालकाने अमेरिकेच्या चौकशी पथकाला सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...