आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेकडो निरापराधांच्या मृत्यूसाठी हाफिज जबाबदार; अटक करुन सजा द्या: US ने पाकला ठणकावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाफिज सईद जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत होता. गुरुवारी त्याला मुक्त करण्यात आले. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
हाफिज सईद जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत होता. गुरुवारी त्याला मुक्त करण्यात आले. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- शेकडो निरापराधांच्या मृत्यूसाठी हाफिज जबाबदार असून त्याला अटक करुन सजा देण्याची मागणी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे केली आहे. हाफिजने दहशतवाद्यांच्या माध्यमातून जगभरात शेकडो जणांचा जीव घेतला आहे. तो 10 महिने नजरकैद राहिल्यानंतर गुरुवारी त्याची सुटका करण्यात आली. हाफिजने याचा आनंद केक कापून व्यक्त केला होता. त्यानंतर त्याने काश्मीरमध्ये आपल्या कारवाया सुरुच राहतील असे म्हटले होते. बुधवारी लाहोर हायकोर्टाने त्याला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. 

 

हाफिजबाबत अमेरिकेने काय म्हटलंय
- हाफिजची मुक्तता करण्यात आल्याने अमेरिका चिंतेत असून पाकिस्तान सरकारने त्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल सजा द्यावी असे म्हटले आहे. 
- दहशतवाद्यांमार्फत हाफिजने अनेकांचे प्राण घेतले आहे. यात अमेरिकेच्या नागरिकांचाही समावेश आहे.

 

हाफिजची दर्पोक्ती
- मुक्ततेनंतर हाफिज सईद म्हणाला की, काश्मीरबद्दल माझा आवाज दाबण्यासाठी मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 
- मी काश्मीरसाठी लढत राहणार आहे. त्यासाठी मी पाकिस्तानी लोकांना एकत्र आणणार आहे. 
- माझ्याविरोधात कोणतेच पुरावे नसल्याने माझी मुक्तता करण्यात आली. भारत माझ्यावर आधार नसलेले आरोप करत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...