आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींसोबत भेटीची किंमत 8 लाख रुपये, अमेरिकेतील वृत्तपत्राने केला दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्‍या शिष्‍टमंडळाची भेट वादात अडकली आहे. या भेटीसाठी आयोजकांनी शिष्‍टमंडळात सहभागी उद्योगपतींकडून पैसा वसूल केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. शिकागोचे वर्तमानपत्र 'हाय इंडिया'मध्‍ये यासंदर्भात वृत्त देण्‍यात आले आहे.

वृत्तानुसार, या दौ-यात प्रतिव्‍यक्ती 3 ते 16 हजार डॉलरपर्यंत रक्कम घेण्‍यात आली. अमेरिकतील रिपब्लिकन खासदार एरोन शॉक यांच्‍या नेतृत्त्वात 18 सदस्‍य‍ीय शिष्‍टमंडळाने गुरुवारी मोदींची भेट घेतली होती. अहमदाबादमध्‍ये साबरमती आश्रमाचा दौरा केल्‍यानंतर मोदींच्‍या निवासस्‍थानी शिष्‍टमंडळाने सुमारे एक तास बंदद्वार चर्चा केली.