आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार राहणार, अमेरिकेच्‍या राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागाराची ग्‍वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिका व भारत हे दोन्ही देश परस्परांचे संरक्षण क्षेत्रातील भागीदार आहेत. भविष्यातही उभय देश भागीदार राहतील, अशी ग्वाही अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर मंगळवारी दिली. मॅकमास्टर भारत भेटीवर असून मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एनएसएचे अजित डोभाल तसेच परराष्ट्र सचिव एस. जय शंकर यांच्याशी देखील चर्चा केली.
 
मॅक मास्टर सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले होते. कुलभूषण जाधव प्रकरणात भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सीमेजवळ अफगाणिस्तानवर सर्वात मोठा बाँब हल्ला केला. त्यावरून संपूर्ण जगात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बाँब हल्ला करणे अफगाणिस्तानच्या हिताचे होते. हा हल्ला दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी होता, असे मॅक मास्टर यांनी अफगाणिस्तानच्या प्रमुखांना सांगितले.
 
मॅक मास्टर अचानक पाकिस्तानला गेले होते. सर्व अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करावी. शेजारी देशांत हिंसाचार पसरवू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. त्याचबरोबर भारत अमेरिकेचा प्रमुख भागीदार आहे. ट्रम्प यांच्या आगमनामुळे भारतासोबतचे संबंध अधिक चांगले होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच मॅक मास्टर यांचा दाैरा महत्त्वपूर्ण मानला जातो.
 
द्विपक्षीय चर्चा : मॅक मास्टर व मोदी यांच्यात झालेल्या चर्चेत द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेण्यात आला आहे. संरक्षण, दहशतवादविरोधी लढाईत सहकार्य करण्यावर उभय देशांत सहमती व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर दक्षिण आशियातील परिस्थितीवरही उभय नेत्यांत चर्चा झाली. बैठकीत एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...