आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama Departs For India Today Security On High Alert

तीन दिवसांत सात वेळा मोदींना भेटतील ओबामा, व्हाइट हाऊसतर्फे \'शेड्यूल\' जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा तीन दिवसीय भारत दौर्‍यावर येत आहेत. ओबामा आज (शनिवारी) भारताकडे रवाना झाले असून रविवारी सकाळी दिल्लीत पोहोचतील. 'व्हाइट हाऊस'ने बराक ओबामांचे पुढील आठवड्याचे शेड्यूल जाहीर केले आहे.

ओबामा मंगळवारी आग्र्याला भेट देणार असल्याचे शेड्यूलमध्ये म्हटले आहे. मात्र, या वृत्ताला परराष्‍ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, केंद्र सरकारने यूपी सरकारला ओबामांची ताज भेट रद्द झाल्याचे कळविले आहे. तीन दिवसांच्या भारत दौर्‍यात कपात करून ओबामा सौदी अरेबियात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौदी अरेबियाचे किंग अब्दुल्ला यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

बराक ओबामा आपल्या तीन दिवसांच्या दौर्‍या दरम्यान सात वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिष्टाचार मोडून स्वत: बराक ओबामांच्या स्वागतासाठी जाणार आहेत.
दुसरीकडे, 'स्वाइन फ्ल्यु' आणि 'बर्ड फ्ल्यु'च्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी शंका निर्माण केली आहे. अमे‍रिकेने 'स्वाइन फ्ल्यु' संदर्भात भारतीय प्रशासनाकडून आढावा घेतला आहे. यामुळे बराक ओबामा यांच्या जेवणात 'चिकन'चा समावेश नसणार, अशी माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, बिहार पोलिसांनी बोधगयामध्ये एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. बराक ओबामा यांना ई-मेल पाठवण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करत होता.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणासाठी ओबामांनी 130 कोटी डॉलर्सचे सहकार्य करावे, अशा मागणीचा ई-मेल पाठवत असल्याचे आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले. दुसरीकडे, ओबामांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून हाय अलर्ट घोषित करण्‍यात आला आहे.

दिल्लीत पोलिसांसह निमलष्करी दलाचे 10 हजार जवान ठिकठिकाणी तैनात करण्‍यात आले आहेत. ओबामांचा भारत दौर्‍याच्या मीडिया कव्हरेजच्या मुद्यावर दोन्ही देशात अद्याप एकमत झालेले नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, बराक ओबामा यांचा तीन दिवसीय कार्यक्रम....