आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barak Obama India Visit Plan And Security

प्रमुख कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा करणार बराक ओबामा, वाचा, तीन दिवसीय कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताच्या 'प्रजासत्ताक दिन' सोहळ्याला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक दृढ होणार आहेत. बराक ओबामांचा तीन दिवसीय कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

25 जानेवारी रोजी ओबामांचे दिल्ली आगमन होणार आहे. विशेष म्हणजे मिशेल ओबामांसह दोन मुलीसोबत असतील. बराक ओबामांचा हा दौरा तीन दिवसांचा राहणार असून यामध्ये ओबामा ताजमहाल पाहण्यासाठी जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

तीन दिवसांच्या भारत दौर्‍यात बराक ओबामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच ओबामा याच दिवशी भारतातील प्रमुख कंपन्यांच्या सीईओसोबत चर्चाही करणार आहेत. अमेरिकेहून आलेल्या एका शिष्टमंडळाचाही त्यात समावेश असेल.

बराक ओबामा भारत दौर्‍यावर असताना यांना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस आणि एसपीजीच्या कमांडोंचे सुरक्षा कवच असेल. अमेरिकेचे सुरक्षा पथक मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. पथकाने कार्यक्रम स्थळ तसेच कंट्रोल रूमचाही आढवा घेतला. बराक ओबामा भारत दौर्‍यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. यामुळे कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण दिल्लीवर नजर ठेवण्यात येणार आहे. भारतीय कंट्रोल रूममध्ये बसून अमेरिकन अधिकारी प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

अमेरिकन सुरक्षा पथक आणि दिल्ली 'आयटीसी'ने हॉटेल 'मोर्या'मध्ये एक मल्टी फ्रीक्वेन्सी कंट्रोल रूम उभारला आहे. बराक आणि मिशेल ओबामा याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत. हॉटेलच्या चहुबाजुंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षा जवान तैनात राहातील.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, असा असेल बराक ओबामांचा तीन दिवसीय दौरा...