आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama Visit To Agra During India Visit

ओबामांचा सुरक्षेसाठी 16 ट्रक शस्त्र; आग्रा येथे दोन ते तीन तास नेटवर्क होणार ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा/नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीला येत आहेत. यापार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ओबामांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ओबामांच्या सुरक्षेसाठी 16 ट्रक शस्त्र उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ‍सूत्रांनी दिली आहे.

बराक ओबामा ते 27 जानेवारीला आग्रा येथील ताजमहलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतील. साधारण एक ते दीड तास तेथे थांबतील. ओबामांच्या सुरक्षेसाठी ताजमहल परिसरात मोठा बंदोबस्त राहिल. ठिकठिकाणी लष्काराचे जवान तैनात राहाणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावनीचे स्वरुप प्राप्त होणार आहे. खबरदारी म्हणून शस्त्र आणि अन्य आवश्यक वस्तू भरलेल्या 16 ट्रक विमानाने येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान शहरातील अनेक परिसरात शुकशुकाट राहील. दोन ते तीन तास मोबाइल नेटवर्क ठप्प राहाणार आहे.

ओबामा येण्याच्या आधी आणि नंतर संपूर्ण शहरातील मोबाइल सेवा ठप्प केली जाणार असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले. ओबामा हवाईदलाच्या विमानाने गेल्यानंतरच नेटवर्क सुरू होईल.

दरम्यान, सन 2000 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आग्रा येथे आले होते. त्यावेळी जॅमरने मोबाइल नेटवर्क ठप्प करण्यात आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, सर्व गोष्टीवर अमेरिकेचे नियंत्रण...