आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama's Special Cadillac Limousine Car

PHOTOS: पाहा, कशी आहे बराक ओबामांची कॅडिलीक वन बिस्ट कार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दिल्लीत उपस्थित राहणार असल्याने भारताकडून अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, अमेरिकी सुरक्षा यंत्रणाही राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेत कोणतीही उणीव राहणार नाही, याची काळजी घेताना दिसत आहेत. त्यासाठी भारतात फिरताना ओबामा स्वत:ची 'द बीस्ट' ही कार वापरणार आहेत. या कारची वैशिष्ट्ये पाहता अमेरिकन सुरक्षा यंत्रणा भारतात ओबामांना हीच कार वापरण्याचा आग्रह का धरत होत्या, याचे कारण स्पष्ट होते. या कारची तुलना चार चाकांचा रणगाडा अशी केल्यास वावगे ठरणार नाही. जनरल मोटर कंपनीकडून तयार करण्यात आलेली 18 फूट आणि फूट 10 इंच उंचीची ही कार आठ इंची जाडीच्या आर्मर कवचाने सुसज्ज आहे. याशिवाय, गाडीच्या बुलेटप्रुफ काचांची जाडी पाच इंच इतकी आहे. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केमिकल शस्त्रांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळते. गाडीच्या दरवाजांची तुलना करायची झाल्यास त्यांचे वजन बोईंग- 757 या विमानाच्या दरवाज्यांइतके जड आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, कशी आहे ओबामांची कॅडिलीक वन बिस्ट कार...