आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी - ओबामा यांची \'चाय पे चर्चा\', मोठ्या घोषणा करण्याचे दिले संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांनी सोबत चहा घेतला.
नवी दिल्ली - भारत दौर्‍यात मोठ्या घोषणा करणार असल्याचे अमेरिकेेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती भवनात पत्रकारांशी बोलताना ओबामांनी ही घोषणा केली. दरम्यान, हैदराबाद हाऊस येथील चर्चेदरम्यान बराक ओबामा आणि मोदी यांची अत्यंत मैत्रिपूर्ण वातावरणात चर्चा सुरू असल्याचे दिसले. यावेळी मोदी आणि ओबामांनी सोबत चहादेखिल घेतला. मोदींनी स्वतः ओबामांना चहा तयार करून दिला.
या दौर्‍यात भारताने तुमच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे पत्रकारांनी ओबामांना विचारले होते. दरम्यान, मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चेला सुरुवात झाली आहे.
दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजघाटावर जाऊन ओबामांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. भारतात करण्यात आलेल्या शानदान स्वागताबाबत त्यांनी आभरही मानले.
राजघाटावरून बराक ओबामा हैदराबाद हाऊसकडे रवाना झाले आहेत. त्याठिकाणी मोदी आणि ओबामा यांच्यात शिखर चर्चा होणार आहे. त्याआधी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांचे स्वागत केले होते. दरम्यान, ओबामांचा भारत दौरा सुर होताच व्हाइट हाऊसतर्फे जय हिंद असे ट्वीट करण्यात आले. हा दौरा भारत अमेरिका मैत्रीची नवी सुरुवात ठरेल असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
त्याआधी पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रोटोकॉल तोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
( मोदींच्या दौर्‍याचे लाईव्ह वेबकास्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )
मोदींच्या दौर्‍याचे UPDATE
4;54 PM बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची ‌जॉइंट प्रेस कॉन्फरन्स
3.30 PM अणु इंधन ट्रॅक करण्याची मागणी अमेरिकेने मागे घेतली. त्यामुळे अणुकरार पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला.
3.10 PM नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे ओबामांना चहा तयार करून दिला.
3.00 PM हैदराबाद हाउसमध्ये बागेत फिरताना दिसले मोदी आणि ओबामा.
1.20 PM हैदराबाद हाऊसमध्ये भारत अमेरिकेत चर्चा सुरू.
1.18 PM बराक ओबामा हैदराबाद हाऊसला पोहोचले. मोदींनी केले स्वागत.
1.06 PM अमेरिकेबरोबर शिखर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद हाऊसला पोहोचले. 12.55 PM राजघाटावर ओबामांनी पिंपळाचे रोप लावले.
12.43 PM ओबामा राजघाटावर पोहोचले, महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
12.27 AM राजघाटाकडे रवाना झाले ओबामा.
12.24 PM बराक ओबामा राष्ट्रपती भवनात म्हणाले, येथे येऊन अभिमान वाटला.
12.17 PM विंग कमांडर पूजा ठाकूरने गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्त्व केले.
12.17 PM ओबामांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले.
12.15 PM राष्ट्रपती बवनात पोहोचले ओबामा. 21 तोफांच्या सलामीने स्वागत. हात जोडून दिले अभिवादनाचे उत्तर.
12.01 PM आयटीसी मौर्यकडून राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले ओबामा.
11.55 AM पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले.
11.44 AM थोड्याच वेळात राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करणार नरेंद्र मोदी. त्याठिकाणी पिंपळाच्या वृक्षाचे रोप लावणार.
11.15 AM व्हाइटहाउसने 'जय हिंद' ट्वीट केल, नात्यांमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात.
10.20 AM मोदी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री अरुण जेटली, नितिन गडकरी, पीयूष गोयल राष्ट्रपती भवनातील भोजन सोहळ्यास उपस्थित असतील.
10.15 AM मौर्य शेरटनमध्ये पोहोचले बराक आणि मिशेल ओबामा.
9.50 AM ओबामा दाम्पत्य मौर्य शेरटनकडे रवाना झाले.
9.48 AM पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामांचे केले स्वागत.
9.45 AM ओबामा आणि मिशेल विमानतळातून बाहेर आहे.
9.40 AM ओबामांचे विमान विमानतळावर उतरले.
8.10 AM भारतीय आणि अमेरिकेचे अधिकारी पालम विमानतळावर पोहोचले. ओबामांच्या स्वागताची तयारी.
8.00 AM पालम विमानतळावर काहीसे धुके, पण एअरफोर्स वनचे लँडिंग व्यवस्थित होण्याची अाशा.
किकडे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्नभूमीवर देशभरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच भर म्हणजे ओबामा भारताच्या दौर्‍यावर येत असल्यामुळे उत्साहाला उधाण आल्याचे चित्र आहे. पण दोन एवढ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी सुरक्षेचीही तेवढीच जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत व्यस्त असणार आहे. मात्र, ओबामांनी ताज महालचा दौरा रद्द केल्याची माहितीही मिळाली आहे.

दिल्लीच्या पालम येथील विमानतळावर पावणे दहाच्या सुमारास ओबामांचे विमान उतरले. त्याठिकाणाहून ओबामा सरदार पटेल मार्गावर असलेल्या हॉटेल मौर्य शेराटनकडे रवाना झाले. सुरक्षेच्या कारणांमुळे या दौर्‍याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे.

ओबामांचा रविवारचा कार्यक्रम
दुपारी 12 वाजता बराक ओबामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती भवनात औपचारिक भेट घेतील. त्यानंतर ओबामा राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील. त्यानंतर बराक ओबामा हैदराबाद हाऊस येथे जातील. पण त्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दुपारचे भोजन करतील. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखामध्ये शिखर चर्चा होईल. त्यानंतर ओबामा आणि मोदी एकत्रितपणे माध्यमांना संबोधित करतील.
सायंकाळी ओबामा हॉटेलमध्ये दुतावासातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतील. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामा दाम्पत्यासाठी राष्ट्रपती भवनात भोजनाचे आयोजन केले आहे.

दिल्लीत उत्साह
ओबामांच्या दौर्‍याबाबत दिल्लीकरांमध्येही मोठा उत्साह आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठीची उपस्थित राहणार आहेत. त्यातून भारत जगातील मोठ्या शक्तींच्या नजरेला नजर भिडवण्यास सक्षम असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही लोकांच्या मते, जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटाबरोबर लढा देत होते, त्यावेळी भारतात मात्र, विकासाचा दर अत्यंत वेगात होता.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTO कार्यक्रमात होणार सहभागी...