आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us President Barak Obama\'s India Vosit, All Was Not Well During Obamas India Visit Asked May I Have A Glass

सावळा गोंधळ: स्‍टेट डिनरदरम्यान गडबड, ओबामांना मागावा लागला पाण्याचा ग्लास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यादरम्यान अपेक्षा तर खूप होत्या मात्र भारतीयांच्या नेहमीच्या घोळामुळे या दौ-याची मजा थोडी कमी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात झालेल्या स्टेट डिनरदरम्यान तर ओबामांना भाषणानंतर पाण्याचा ग्लास पण मागावा लागला होता. या डिनरला सुमारे फक्त 250 पाहुणे होते मात्र, तेथे पुरविण्यात आलेली व्यवस्था ठीक नव्हती असेच म्हणावे लागेल. राष्ट्रपती भवनातील अधिकारी मात्र खुलासा करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती भवनात एकच किचन आणि पॅंट्री आहे. यामुळे काही टेबल्सवर सर्व्हिस देताना उशीर झाला.

मंत्र्यांनाही पाहावी लागली वाट- कडक सुरक्षा व्यवस्थाही अडचणीची ठरली. कित्येक निमंत्रित पाहुणे तर सायंकाळी 7.20 नंतरच रांगेत येऊन उभे राहिले होते. असे असले तरी ओबामा या डिनरला एक तास उशिरा पोहचले. भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येतो याची वाट पाहावी लागत होती.

प्रजासत्ताक दिन समारंभातही ठीक नव्हती व्यवस्था -
ओबामा पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत जे भारताच्या प्रजासत्ताक दिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. परेड समारंभात हलकासा पाऊस होत होता. हवामान विभाग याबाबत अंदाज व्यक्त करण्यास अपयशी ठरले. दुसरीकडे, ओबामा आणि अन्य काही प्रमुख पाहुण्यांना बुलेटप्रूफ केबिन तर बनविली पण त्यात पाऊस आला तर त्यावर झाकण्यासाठी व्यवस्थाच नव्हती. ओबामा, मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी छताची व्यवस्था करण्यात आली मात्र मिशेल ओबामा आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांची पत्नी सलमा अन्सारी यांना मात्र एकाच छत्रीखाली थांबून पावसापासून बचाव केला. एवढेच नव्हे तर ओबामा आणि मोदी यांना सुमारे एक तास मोकळ्या वातावरणातच थांबावे लागले त्यानंतर छताची सोय करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा केबिनला छत बनविण्याबाबत चर्चा झाली मात्र तशी कोणतेही परंपरा नसल्याने तसे करण्यापासून रोखले गेले. राजनाथ सिंग यांच्यासह अनेक नेते आणि निमंत्रितांना परेड ब्रोशरपासून पावसापासून आपला बचाव करावा लागला.

कडक सुरक्षा व्यवस्थाच ठरली अडचण-
राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत झाल्यानंतर ओबामा आणि मोदी हैदराबाद हाऊसकडे रवाना झाले जेथे दोन्ही देशांदरम्यान थेट चर्चा होणार होती. मात्र, धक्कादायकरित्या विदेश सचिव सुजाता सिंह, अमेरिकेतील भारतीय राजदूत जयशंकर, पीएमओचे संयुक्त सचिव जावेद अशरफ यांना हैदराबाद हाऊसमध्ये जाण्यास रोखले गेले. कारण कडक सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी बहुतेक महत्त्वाचे रस्ते बंद करून ठेवले होते.