आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barack Obama In India On Indian Republic Day, Barack Obama Car Isseue

भारतीय राष्ट्रपतींची कार UNSAFE, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांचा कारमध्ये बसण्यास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आपली स्पेशल कार 'द बीस्‍ट'मध्ये बसलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा.)

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे 26 जानेवारीला गणतंत्र दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौर्‍यावर येत आहेत. मात्र, बराक ओबामा हे भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारमध्ये बसणार नसल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय राष्ट्रपतींची कार असुरक्षित असल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, शिष्टाचारानुसार प्रमुख पाहुणे बराक ओबामा यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत त्यांच्या कारमधून राष्ट्रपती भवन ते राजपथ असा प्रवास करावा लागेल. मात्र, अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीला हे मान्य नसल्याचे समजते.

भारतीय राष्ट्रपतींनी बराक ओबामांसोबत ‘द बीस्ट’मधून यावे...
दरम्यान, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रपती आणि अमेरिकेचे अध्यक्षांनी अत‍िसुरक्षित कार 'द बीस्ट'मधून कार्यक्रमस्थळी जावे, अशी अमेरिकन प्रशासनाची इच्छा आहे. मात्र, भारतीय प्रशासनानुसार, प्रमुखपाहुणे बराक ओबामा हे यजमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कारमधून कार्यक्रमस्थळी जावे. यासाठी अतिसुरक्षित कार वापरली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पाठवले नियोजन...
अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजेंसीने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला बराक ओबामा यांच्या सुरक्षितते पार्श्वभूमीवर एक प्लान पाठवला आहे. राष्ट्रपती भवन ते राजपथपर्यंत जाण्यासाठी राष्ट्रपतींच्या कारचा वापर करण्याऐवजी ओबामा यांची अतिसुरक्षित कार 'द बीस्ट'चा वापर करावा, असे त्यात सांगण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रपतींची कार असुरक्षित असल्याचे अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजेंसीने म्हटले आहे. मात्र, हे भारताच्या शिष्टाचाराला अनुसरून नसल्याचे भारतीय प्रशासनाने म्हटले आहे.