आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Secretary Of State John Kerry News In Marathi

जाणून घ्या, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी का आले आहेत भारत दौऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- जॉन केरी यांनी दिल्लीच्या आयआयटीला भेट दिली.)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी भारत दौऱ्यावर आले आहेत. काल (बुधवार) त्यांचे भारतात आगमन झाले. कोणत्याही देशाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि वरिष्ठ नेते काही खास हेतू असल्याशिवाय कोणत्याही देशात जात नाहीत. जॉन केरी भारत दौऱ्यावर आले आहेत, ते काही खास हेतू घेऊन. तर जाणून घेऊयात जॉन केरी यांच्या भारत दौऱ्याची पार्श्वभूमी.
:- नरेंद्र मोदी यांना यापूर्वी अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा नाकारला आहे. मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी मोदींच्या मनातील कटूता दूर करण्याचा जॉन केरी प्रयत्न करतील. मोदींच्या सप्टेंबर महिन्याच्या दौऱ्यात उपयुक्त चर्चा व्हावी यासाठी व्यासपिठ तयार करणार आहेत.
:- भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यात भारत-अमेरिका अणू करारातील काही तरतुदींना विरोध करण्यात आला होता. यामुळे हा करार पुढे टिकतो की मागे पडतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमिवर मोदी सरकारची भूमिका केरी जाणून घेतील.
:- जॉन केरी यांच्यासोबत अमेरिकेचे वाणिज्य मंत्री पेन्नी प्रित्झकर आहेत. यामुळे उभय देशांत व्यापार वृद्धीवर निश्चितच विचार केला जाईल.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जॉन केरी यांच्या भारत दौऱ्यामागची ठळक कारणे...