आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रांचाही वापर होईल. सप्टेंबरपर्यंत ७३ हजार ५०० यंत्रे मिळाली तर त्यांचा वापर गुजरातच्या निवडणुकीत केला जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. निवडणूक आयोगाच्या उत्तरावर समाधान व्यक्त करत सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.  

सरन्यायाधीश खेहर म्हणाले की, “गुजरात निवडणुकीत व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.’ मात्र, याचिकाकर्त्याच्या आग्रहावरून गुरुवारीही या प्रकरणाची सुनावणी होईल. खंडपीठाने इशारा देताना म्हटले की, ‘ही सुनावणी विनाकारण ठेवली जात आहे. त्याचे गंभीर परिणाम होतील. तुम्ही न्यायालयात वेळ बरबाद करू शकत नाही.’ आयोगाने न्यायालयाला सांगितले की, ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे आरोप करण्यात आले; पण कुठलाही राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ईव्हीएमममध्ये छेडछाड होत असल्याचे सिद्ध करू शकली नाही.  

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करावा, अशी मागणी करणारी एक याचिका पाटीदार आंदोलनाशी संबंधित एका नेत्याने दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलैला नोटीस जारी करून निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवले होते.

आयोगाकडे सध्या साडेत्रेपन्न हजार व्हीव्हीपॅट यंत्रे 
निवडणूक आयोगाने शपथपत्रात म्हटले आहे की, आयोगाकडे सध्या ५३ हजार ५०० व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत. गुजरात निवडणुकीसाठी ७० हजार यंत्रे हवीत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून ३१ ऑगस्टपर्यंत ४८ हजार यंत्रे मिळणार आहेत. उर्वरित २५ हजार ५०० यंत्रे सप्टेंबरपर्यंत मिळतील. ही यंत्रे वेळेवर मिळाली तर विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला.
बातम्या आणखी आहेत...