आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणप्रकरणी न्‍या. गांगुलींवर कारवाई करण्‍यासाठी दिल्‍ली पोलिस सज्‍ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कायद्याचे शिक्षण घेत असलेल्‍या एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्‍याप्रकरणी आता दिल्‍ली पोलिसांकडून लवकरच कारवाई करण्‍याचे संकेत मिळाले आहेत. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्‍यायमूर्ती ए. के. गांगुली यांच्‍यावर या विद्यार्थिनीने आरोप केले आहेत. यासंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थापन केलेल्‍या चौकशी समितीनेही न्‍या. गांगुली यांच्‍या वर्तनावर आक्षेप घेतला होता. चौकशी अहवालातील काही भाग समोर आल्‍यानंतर आता पोलिसांकडून कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे. दिल्‍ली पोलिस सुमोटो दखल घेऊन गुन्‍हा दाख करु शकतात.

याप्रकरणी आता दिल्‍ली पोलिसांच्‍या कोर्टात चेंडू आहे. प्राप्‍त माहितीनुसार, दिल्‍ली पोलिसांनी पीडित तरुणीला ईमेलद्वारे संपर्क साधला असून तिला याप्रकरणी जबाब नोंदविण्‍यास सांगण्‍यात आले आहे. पीडितेचा जबाब नोंदविल्‍याविना कारवाई केल्‍यास दिल्‍ली पोलिसांनाच फटका बसू शकतो, असे कायदेतज्ञांचे मत आहे. म्‍हणूनच पोलिसांनी तिचा जबाब नोंदविण्‍याच्‍या दिशेने प्रयत्‍न सुरु केले आहेत.