आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींनी UPमधील BJP खासदारांना विचारले दोन प्रश्न, 71 नेत्यांपैकी एकाने दिले नाही उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी स्वतः उत्तरप्रदेशमधील वाराणसीचे खासदार आहेत. अमित शहा तेव्हा UP चे प्रभारी होते. - Divya Marathi
मोदी स्वतः उत्तरप्रदेशमधील वाराणसीचे खासदार आहेत. अमित शहा तेव्हा UP चे प्रभारी होते.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूीवर बोलावलेल्या भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन प्रश्न विचारल्यानंतर सगळीकडे शांतता पसरली होती. ग्रामीण भागात वीज आणि पीएमओ मोबाइल अॅप संबंधी विचारलेल्य प्रश्नावर उत्तर प्रदेशातील एकही खासदार उत्तर देऊ शकले नाही. त्यानंतर मोदींनी खासदारांना केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष्य ठेवण्यास आणि अपडेट राहाण्याचा सल्ला दिला.

मोदींनी विचारले खासदारांना दोन प्रश्न
- मोदींनी उत्तर प्रदेशातील खासदारांना पहिला प्रश्न विचारला - तुमच्या भागातील त्या गावांची यादी द्या, जिथे केंद्र सरकारच्या दीनदयाल ज्योतिग्राम योजनेंतर्गत वीज पुरवाठा सुरु झाला आहे ?
- माध्यमातील वृत्तानूसार, मोदींच्या या प्रश्नाचे एकही खासदार उत्तर देऊ शकला नाही.
- मोदींचा दुसरा प्रश्न होता - आपल्या पैकी किती खासदारांनी पीएमओने गेल्या वर्षी लाँच केलेला मोबाइल अॅप डाऊनलोड करुन घेतला आहे ?
- यावरही एकाही खासदारांची चुप्पी तुटली नाही किंवा एकानेही हात उंचावून माझ्याकडे अॅप आहे, असे म्हटले नाही.
- 'गर्व' नावाने पीएमओने लाँच केलेल्या अॅपमध्ये सरकारच्या यशस्वी योजना आणि सरकारने घेतलेला पुढाकार यांची अद्ययावत माहिती असते.
- त्यानंतर पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सर्वसमान्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
- उत्तर प्रदेशात 2017 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. येथे समाजवादी पक्षाचे सरकार आहे, तर बहुजन समाज पक्षाचीही येथे ताकद आहे.
- लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातून 80 पैकी 71 जागा मिळाल्या होत्या. मोदी स्वतः वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले.
- ते लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार असून शेतकऱ्यांसाठीची नवी योजना जाहीर करणार आहेत.

गैरहजर राहाणाऱ्या 12 BJP खासदारांची संसदीय समित्यांमधून गच्छंती
- भाजपने संसदीय समित्यांमधून गैरहजर राहाणाऱ्या खासदारांवर कडक कारवाई केली आहे.
- पक्षाने तीन महत्त्वाच्या समित्यांच्या बैठकांना गैरहजर राहाणाऱ्या 12 खासदारांना समितीमधून काढून टाकले आहे.
- भाजपने 12 खासदारांना ज्या समितीवरुन दूर केले आहे त्यात, लोक लेखा समिती (पीएसी), इस्टीमेट समिती आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग यांचा समावेश आहे.
- समित्यांवरुन काढलेले खासदार आहेत विनोद खन्ना, दर्शना विक्रम जडोह, संजय जायसवाल, कीर्ति आजाद, ओम बिर्ला आणि गणेश सिंह. हे खासदार इस्टेमट समितीचे सदस्य होते.
- पीएसी समितीवरुन - एस.एस. अहलूवालिया, दुष्यंत सिंह आणि रमेश पोखरियाल निशंक यांना काढले आहे.
- कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंगवरुन वरुण गांधी, नंद कुमार सिंह चौहान आणि पंकज चौधरी यांना काढण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भाजपच्या बैठकीत मोदी
बातम्या आणखी आहेत...