आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Public Will Give The Answer To Demonetization In Elections, Mayavati

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जनता देईल नोटाबंदीला उत्तर, मायावतींची टिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने देशातील बहुतांश लोकांना ‘फकीर’ बनवले, अशी टीका बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी केली. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत व्हावे लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मायावती म्हणाल्या की, ते (मोदी) अजून ‘फकीर’ झाले नाहीत, पण देशातील ९० टक्के जनता मात्र ‘फकीर’ बनली आहे. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस दिवाळखोर झाला आहे. लोकांना आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. नोटाबंदीमुळे लोकांची एवढी अडचण झाली आहे की ते आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव तर करतीलच; एवढेच नव्हे, तर त्या पक्षाला चौथ्या क्रमांकावर फेकतील. बसप काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातच आहे, असे स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, नोटाबंदीपूर्वी योग्य नियोजन केले नाही याला आमचा आक्षेप आहे.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदुत्वाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. त्यांचा डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर विश्वास नाही, असा आरोपही मायावती यांनी केला.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा नवी दिल्लीत म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे मायावती यांच्या पक्षाचा काळा पैसा काहीच कामाचा राहिलेला नाही. त्यांच्या नाराजीचे कारण हेच आहे. देशातील जनता केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयासोबत आहे. आमचे सरकारही गरिबांच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांवर काम करत आहे.

‘बबुआ’च्या स्वप्नात येतो हत्ती
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव मायावती यांना ‘आत्या’ म्हणतात. त्यांच्यावर पलटवार करताना मायावती म्हणाल्या की, ‘बबुआ’च्या स्वप्नात हत्ती येतो. त्यामुळे ते घाबरलेले आहेत. बालिश वक्तव्य करणाऱ्याला बबुआ म्हणणेच योग्य आहे. गेल्या नऊ वर्षांत बसपाच्या हत्तीने एक पाऊलही पुढे टाकले नाही, या वक्तव्यावरून मायावतींनी अखिलेश यांच्यावर टीका केली. लोहिया आणि जनेश्वर पार्कमध्ये लावलेल्या पुतळ्यांनी आपली जागा बदलली आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आधी सार्वजनिक सुटी रद्द करण्याचा आदेश दिला, नंतर ती पुन्हा जाहीर केली. यावरून त्यांची मानसिकता कळते.

पुढे वाचा... नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वांचाच खेळ बिघडला, अमित शहांचे वक्तव्य
बातम्या आणखी आहेत...