आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Disaster And India Manmohan Singh Prime Minister Obama

पीडितांची गळाभेट घेवून सांत्वन करणारे ओबामा अन् केवळ हवाई दौरा करणारे आपले मनमोहन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्ली- उत्तराखंडममध्ये झालेल्या ढगफुटीनंतर सर्वत्र गाळाचे साम्राज्य पसरले आहे. एवढेच नाही तर सर्वत्र पडलेल्या मृत देहाचे कुत्रे अक्षरश: लचके तोडत आहेत. केंद्राने उत्तराखंड राज्य सरकारला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हवाई दौरा करून पीडितांची थट्टाच केली आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये आणीबाणीची परिस्थिती असताना मुख्यमंत्री विजय बहुगुणा हे तर स्वित्झर्लंड दौर्‍यावर जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते परंतु ऐनवेळी हायकमांडने फटकारल्यानंतर त्यांना उचलले पाऊल मागे घ्यावे लागले आहे.

मागील वर्षी आलेल्या सॅंडी वादळाने अमेरिकेत हाहाकार माजवला होता. वादळामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले होते. तेव्हा अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पीडितांची गळाभेट घेवून त्यांचे सांत्वन केले होते. त्यांना धीर दिला होता. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर उ‍त्तराखंडचा हवाई दौराकडून पुरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहे. लोकशाही असलेल्या देशात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.