आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये 90 दिवसांपासून वणवा, ग्लेशियर वितळण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तराखंडच्या जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्याने हिमालयातील ग्लेशियर्स वितळण्याची शक्यता आहे. आगीमुळे ओझनच्या थरावर थेट परिणाम होत आहे. आगीमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता एवढी आहे, की चार ते पाच मोठ्या महानगरांमध्ये एक वर्षात जेवढे प्रदुषण होऊन त्याचा वातावरणावर जो परिणाम होतो. तेवढेच नुकसान या आगीने केवळ दोन तासांमध्ये होत आहे. उत्तराखंडमधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये 90 दिवसांपासून वणवा पेटला आहे. तो आता हिमालयापर्यंत पसरला आहे.

ग्लेशियरवर कसा होणार परिणाम
- नैनीतालमधील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ऑब्जर्व्हेशनल सायन्स (एआरआयईएस) आणि अल्मोडाच्या गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हार्यमेन्ट अँड डेव्हलपमेंट (जीबीपीआयएचईडी) ने म्हटले आहे, की धुर आणि राखेतील कार्बनने ग्लेशियरला झाकून टाकले आहे.
- जाणकारांचे मत आहे, की वणव्यामुळे उत्तर भारताच्या तापमानात 0.2 अंशांनी वाढ केली आहे. याचा मान्सूनवरही परिणाम होऊ शकतो.
- शास्त्रज्ञ किरीट कुमार म्हणाले, 'ब्लॅक कार्बन हवेत अनेक दिवस तरंगत राहातो आणि ढगात जमा होतो.'
- यामुळे तो मान्सुनवरही परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ब्लॅक कार्बन ढगांमध्ये मिसळल्यामुळे त्याचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात.

कोणत्या ग्लेशियर्सवर होऊ शकतो परिणाम
- गंगोत्री, मिलाम, सुंदरदुंगा, नेवला आणि चीपा हे ग्लेशियर वितळण्याची भीती आहे. त्याचा परिणाम उत्तर भारतातील नद्यांवरही होऊ शकतो.
पुढील स्लाइडमध्ये,
>> 1500 गावांना धोका
>> केंद्राने दिले 5 कोटी
बातम्या आणखी आहेत...