आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Governor Aziz Qureshi Refuses To Quit, Challenges Modi Govt In SC

उत्तराखंडचे राज्यपाल पद सोडण्यावर अडून, सुप्रीम कोर्टाने मागितले केंद्र सरकारला स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तराखंडचे राज्यपाल पद सोडण्यास नकार देणारे अजिज कुरेशी यांनी मोदी सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे.
केंद्रात भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आल्यानंतर यूपीएच्या काळात नियुक्त राज्यपालांना पद सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर अनेक राज्यपालांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यावेळी कुरेशी यांनी पद सोडण्यास नकार दिला होता. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरोधात कुरेशींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

न्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या पिठासमोर तत्काळ सुनावणीसाठी ही याचिका होती. त्यात म्हटले आहे, की केंद्रीय गृह सचिवांचा पद सोडण्यासाठीचा फोन आला. हा फोन कॉल या 'पदाची अवहेलना' करणारा होता. भारतीय संविधानाच्या 156 (1) नुसार जर, राष्ट्रपतींनी एखाद्या व्यक्तीची राज्यपाल पदी नियुक्ती केली आणि त्याने त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काम केले, तर ते त्यांना कोणतीही आडकाठी न आणता पाच वर्षे पदावर कायम ठेवू शकतात.
कुरेशी यांचे म्हणणे आहे, की त्यांना पदावरुन दूर करण्याचा अधिकार जर कोणाला असेल, तर तो फक्त राष्ट्रपतींना आहे. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे, की राज्यपाल हे काही केंद्र सरकारचे कर्मचारी नाहीत.