आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand No DNA Samples, Chopper Crash Victims Hard To Identify

शहीद जवानांची ओळख पटवण्याचे आव्हान; अंत्यसंस्कारास होणार विलंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तराखंडमधील बचावकार्यादरम्यान गौरीकुंडाजवळ कोसळलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील 20 जवान शहीद झाले होते. 20 पैकी 17 जळाले असल्याने त्यांची ओळख पटवण्‍याचा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शहीद जवानांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यापू्र्वी त्यांची ओळख पटविणे आवश्यक आहे.

हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे शहीद झालेल्या सैनिकांचे डीएनएचे नुमने हवाई दलाकडे नसल्यामुळे हा प्रश्न उद्‍भवला आहे. त्यामुळे शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला विलंब होणार आहे.

शहीद शशिकांत पवार यांच्या आईच्या रक्ताचे नमुने दिल्लीला रवाना
उत्तराखंडात बचावकार्यादरम्यान गेल्या मंगळवारी कोसळलेल्या हेलिकॉप्टरमधील शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे. त्यापैकी एक धुळ्याचे शशिकांत पवार तर दुसरे जळगावचे गणेश अहिरराव आहेत. शहीद शशिकांत पवार यांच्या आईचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते दिल्लीला पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, हवाई दलाच्या अजून तीन जवानांचे मृतहेद सापडलेले नाहीत. खराब हवामानामुळे मृतदेह शोधण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.