आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलयानंतरची गोष्‍ट : उत्तराखंडच्या फेरउभारणीसाठी 3 हजार कोटी रुपये अपेक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाऊस व पुरामुळे उत्तराखंड उद्ध्वस्त झाला आहे. पूरग्रस्त भागाच्या फेरउभारणीसाठी जागतिक बॅँक आणि आशिया विकास बॅँकेसारख्या आंतरराष्‍ट्रीय संस्थांची मदत घेतली पाहिजे, अशी माहिती उत्तराखंड सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयालात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.


या कामाचा अंदाजित खर्च 3,000 कोटी रुपये आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला 10 जुलै रोजी पुन्हा शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे. पुरामुळे केदारनाथ, बद्रीनाथ, उत्तरकाशी आणि गौरीकुंड या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले असून राज्याचे 700-800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. साधारण 1,859 रस्ते आणि 252 पूल वाहून गेले आहेत.


उत्तराखंडमध्ये 15 हजार बळी : लाड
बंगळुरू । उत्तराखंडमध्ये जवळपास 15 हजार नागरिकांचे बळी गेले आहेत, असा दावा कर्नाटकचे माहितीमंत्री संतोष लाड यांनी केला आहे. उत्तराखंडमधील पूर जागतिक नैसर्गिक आपत्तीपैकी एक असू शकते. त्यांनी बद्रीनाथला भेट दिली आहे. या दुर्घटनेत 70 % स्थानिकांना फटका बसला असेल, असे लाड म्हणाले.