आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात सत्ता उलथवण्याच्या कटाचा व्ही.के. सिंहांवर आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्यावर गंभीर आरोप करून भारतीय लष्कराने एक अहवाल केंद्र सरकारकडे सोपवला आहे. सिंह यांनी स्थापन केलेल्या गुप्तचर विभागात अनेक घोटाळे असल्याचे अहवालात नमूद असून यासाठी दिलेल्या निधीचा वापर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील उमर अब्दुल्ला सरकार उलथवून टाकण्यासाठी केल्याचा आरोप सिंह यांच्यावर आहे.


शुक्रवारी हा अहवाल फुटला आणि केंद्र सरकारनेही यासंबंधी अहवाल मिळाल्याचे मान्य केले. दरम्यान, भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पाच दिवसांपूर्वी व्ही. के. सिंह आणि नरेंद्र मोदी रेवाडीमध्ये एका व्यासपीठावर आल्याने सरकारने मुद्दाम त्यांना या प्रकरणात गोवले असल्याचा आरोप निर्मला सीतारमण यांनी केला.
या प्रकरणी वेळ आल्यावर योग्य स्पष्टीकरण देऊ, असे सिंह यांनी म्हटले आहे.


अहवालातील आरोप
० जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता उलथवण्याचा प्रयत्न.
० जनरल विक्रमसिंग यांना लष्करप्रमुखपद देण्याच्या प्रक्रियेत बाधा आणली.
० गुप्तचर विभागामार्फत बेकायदा कारवाई करण्याचा प्रयत्न. यासाठी 2010 मध्ये सिंगापूरहून 8 कोटींचे साहित्य खरेदी केले.
० लष्करातील गुप्तचरांसाठी दिलेल्या निधीचा वापर इतर कार्यवाहीसाठी केला