आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्ही. के. सिंह भाजपमध्ये; राखी सावंत म्हणाली, \'मै भाजप की बेटी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (भाजप) रोज अनेकांचा प्रवेश होत आहे. अायटम गर्ल राखी सावंत आज (शनिवार) भाजप प्रवेशासाठी दिल्लीत दाखल झाली आहे, तर दुसरीकडे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाले होते. वेळोवेळी राळेगणसिद्धी येथे येऊन त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
व्ही.के. सिंह लष्करप्रमुख असताना त्यांच्या निवृतीवेळी वयावरून वाद निर्माण झाला होता. आज सकाळी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत लष्करातील अनेक निवृत्त अधिकारी होते. पक्ष प्रवेशानंतर त्यांनी अमरज्योती स्मारकाला भेट दिली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या एका कार्यक्रमात ते त्यांच्या सोबत होते. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता.
पक्ष प्रवेशानंतर ते म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि राष्ट्राच्या हिताचा पर्याय जर कोणी असेल तर, तो फक्त भाजप आहे. देशाला वाचविण्यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या पक्षात सहभागी होण्याचा मी निर्णय घेतला आहे.'

पुढील स्लाइडमध्ये, राजस्थानमधून लढविणार लोकसभा आणि
कोणी-कोणी केला आज भाजपमध्ये प्रवेश