आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • V K Singh Used Secret Funds To Try And Topple J&K Govt

जम्मू-काश्मीर सरकार अस्थिर करण्यासाठी लष्कराच्या गुप्तचर विभागाचा निधीचा गैरवापर?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंह आणि लष्काराची गुप्तचर विभागावर जम्मू-काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला सरकारला अस्थिर करण्‍यासाठी गुप्त सेवा निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय जनरल बिक्रम सिंह यांची बढती रोकण्याचाही आरोप लष्कराच्याच एका समितीने केला आहे.

लष्कराच्या तांत्रिक सेवा विभागाने या कामांसाठी निधीचा गैरवापर केल्याचे लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांच्या चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या सर्व प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी होण्याची शक्यता आहे.

माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सिंह यांनी लष्करातील तांत्रिक सेवा विभागाची स्थापना मे 2010 मध्ये केली होती. लष्काराच्या तांत्रिक सेवा विभागाची कार्यपद्धतीची सरकार दरबारी गार्भियाने दखल घेण्यात आली असून याप्रकरणी सरकर सीबीआय चौकशीचे आदेश देवू शकते. सरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी अहवाल प्राप्त झाल्याचे म्हटले आहे.

लष्करातील हे कथित प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत असल्याने सरकार या अहवालावर सखोल चौकशीअंतीच निर्णय घेणार असल्याचे कळते. परंतु याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याबाबत निर्णय झाला नसल्याचेही संरक्षण मंत्रालयाने कळवले आहे.

केंद्रीय माहिती सुचना प्रसारण मंत्री मनीष तिवारी म्हणाले, अहवालात धक्कादायक पुरावे सादर करण्यात आले आहे. लष्कारीतील सेवानिवृत्त अधिकारी या प्रकरणात आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.