आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी-वढेरा फोटो लीक; अदानींच्या विमानात बसले होते रॉबर्ट वढेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अहमदाबाद.प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा गुजरातचे उद्योगपती अदानी यांच्या विमानात बसून कच्छला गेले होते. दोघांचा फोटो जाहीर होताच काँग्रेस अडचणीत सापडल्याचे दिसते. राहुल गांधी आपल्या सभांमधून नरेंद्र मोदी यांचे अदानी यांच्याशी संबंध असल्यावरून जोरदार टीका करत आहेत. भाजपने अडवानींना बाजूला बसवले आहे. त्यांची जागा अदानींनी घेतली आहे. गुजरातमध्ये अदानींचे सरकार आहे, असा आरोप राहुल यांनी शुक्रवारी डोडामध्ये केला होता. त्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रातून हा फोटो प्रकाशित झाला आहे. फोटो 2009 मधील आहे. वढेरा गुजरातमधील मुंदडा येथे अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर प्रकल्प पाहण्यासाठी गेले होते. वढेरा आणि गौतम अदानी खासगी विमानाने तेथे गेले होते. मोदीदेखील अदानी यांच्या विमानाने प्रवास करतात, असा आरोप काँग्रेसदेखील करते. हा फोटो जाहीर झाल्याने काँग्रेस बॅकफूटवर पडली आहे.