आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचे पॅकेज सोडून शिकवतोय वैदिक शेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर डिग्री, बेल्जियम आणि फ्रान्समध्ये तीन वर्षांपर्यंत थर्ड जनरेशन सोलर सेलवर संशोधन, कार्बन नॅनो ट्यूबवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध.. असे शानदार करिअर असणारे 26 वर्षीय संशोधक सर्मथ जैन 36 लाख रुपये वार्षिक वेतन असलेली नोकरी सोडून जशपूरसारख्या मागास आणि आदिवासी भागात शेतकर्‍यांना वैदिक शेती शिकवत आहेत.
सर्मथ म्हणाले की, भाजीपाल्याची शेती करताना जर तुम्ही शेताच्या बांधावर मोहरी लावली तर भाज्यांना कीड लागणार नाही. भेंडीसारख्या पिकाच्या शेतात एका ओळीत झेंडूची फुले लावावीत. फुले तर मिळतीलच, पिकांना नुकसान पोहोचवणारे कीटक-पतंग फुलांमध्येच अडकून पडतील. भेंडी आणि बाकी भाज्यांकडे त्यांचे लक्षच जाणार नाही. कडुनिंब आणि मोहरी यांच्या मिर्शणाने एक असे कीटकनाशक तयार होते, जे कुठल्याही रोगावर रामबाण आहे. प्राचीन वेद आणि ग्रंथांत शेती, बीजोपचार आणि खत तयार करण्याच्या अशाच पद्धतीचा उपयोग आज मी करून दाखवत आहे.

परदेशी संस्थांमध्येही सुरू आहे शोध : 26 वर्षीय सर्मथ यांच्या मते, खत तयार करणे, जमिनीची उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी वेद-पुराणांमध्ये प्रचंड माहिती आहे; पण त्याचा विसर पडला आहे. ऑक्सफर्डसह अनेक विदेशी संस्थांमध्ये याच ज्ञानावर शोध सुरू आहे.

केळ्याच्या शेतीपासून सुरुवात, दुग्धोत्पादनातही वाढ
बेल्जियममध्ये शेतकर्‍यांना र्शीमंत समजले जाते, असा अनुभव दीड वर्षापासून तेथे राहिलेले सर्मथ यांना आहे. ते जेव्हा जशपूरला आपल्या घरी येत तेव्हा त्यांना त्याउलट चित्र दिसत होते. त्यामुळे आता शेतीतच काही करायचे, असा निर्णय त्यांनी घेतला. वाडवडिलांकडून आलेल्या 10-12 एकर शेतावर त्यांनी केळ्याची शेती सुरू केली. रात्री लॅपटॉपवर सिम्युलेशन टेक्निकच्या मदतीने संशोधन करत असत आणि रात्री शेती. सेंद्रिय शेतीत प्रयोग केले. शेणखत, गांडूळखत, पाण्याचे प्रमाण वाढवून अथवा घटवून सिंचन केले. एक-दोन वर्षांनंतर उत्पादनात वेगाने वाढ झाली. दुधाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शेतातच दूध डेअरी सुरू केली.