आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaidik Hafiz Sayd News In Marathi, Terror Attack On Mumbai

वैदिक-हाफिज सईद भेट खासगी स्वरूपाची, पाकिस्तानचेही हात वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय पत्रकार वेदप्रताप वैदिक आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यांची भेट खासगी स्वरूपाची होती, असे स्पष्ट करून सईद विरोधात कसलाही पुरावा नाही. त्यामुळे त्याला अटक करता येणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानने हात वर केले आहेत. वेदप्रताप वैदिक यांच्या दौ-यावरून निर्माण झालेल्या वादंगावर सरकारने ही भेट झाल्याचे ठाऊकच नाही, असे म्हटले आहे.

प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी ही माहिती दिली. वैदिक व सईद यांची भेट म्हणजे माझ्या दृष्टीने दोन खासगी व्यक्तींची भेट आहे. आमच्या सरकारला त्याबद्दल काहीही कल्पना नाही. दोन व्यक्तींमधील ही भेट आहे. त्यापेक्षा अधिक काहीही नाही, असे बासीत म्हणाले.