आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishno Devi Yatra Issue, Udhanpur Katara Railway Track Complete

वैष्णोदेवी यात्रा होईल सोयीची;उधमपूर-कटरा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कठीण वाटणारी यात्रा आगामी काळात सोयीची होऊ शकेल. या यात्रेतील कटरा येथील मदत छावणीपर्यंत जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्या सुरू होऊ शकतील. तशी तयारी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.

25 किलोमीटर लांबीच्या उधमपूर-कटरा रेल्वेमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे खात्याने संबंधित विभागाकडे मंजुरी मागितली आहे. तसा प्रस्तावही अधिकार्‍यांनी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडे सादर केला आहे. या डोंगराळ भागात रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल तसेच उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. गुप्ता मार्गाची पाहणी करतील. या मार्गावर 7 बोगदे असून 30 छोटे-मोठे पूल आहेत. यातील एक बोगदा तर 185 फूट उंचीवर आहे. दरवर्षी सुमारे 1 कोटी भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येतात. डोंगराळ भागातून प्रवास करत असताना भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भाविकांची आता नव्या रेल्वे मार्गामुळे सोय होणार आहे.