आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णवदेवीची प्रतिमा असलेल्या नाण्याला मुस्लिम संघटनेचा विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वैष्‍णवदेवीची प्रतिमा असलेल्या पाच रुपयांच्या नाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या नाण्याला मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शविला आहे. वैष्णवदेवीच्या या नाण्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. 'मूव्हमेंट ऑफ ह्यूमन वेलफेअर'चे अध्यक्ष डॉ. अजीमुद्दीन यांनी सांगितले की, नाणे भिखार्‍यांमध्ये वाटले जातात. तसेच मिरवणुकीत ते उधळले जातात. त्यामुळे वैष्‍णवदेवीची अवमान होईल.

दरम्यान, श्री माता वैष्णवदेवी श्राइन बोर्डाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तान रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने हे नाणे जारी केले होते. जमीयत-उल-उलेमाचे अध्यक्ष मौलाना मुस्तकीम आझमी यांनी याप्रकरणी विरोधही दर्शविला होता.

दुसरीकडे, हिंदूत्तवादी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी सांगितले की, यापूर्वी ख्रिश्चन संत अल्फोंसा तसेच मदर टेरेसा यांची प्रतिमा असलेली नाणी बाजारात दाखल झाली होती. असे असताना वैष्णवदेवीची प्रमिका असलेल्या नाण्यालाच विरोध का? असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला आहे. अनेक दुकानदारांनी सांगितले की, अल्पसंख्यक समुदायातील लोक असे नाणे घेण्यास नकार देतात.

यापूर्वी, 'सरोगेसी'च्या (भाड्याने घेतलेले गर्भाशय) माध्यमातून बाळाला जन्म देणारा बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान विरोधात मरकजी दारुल इफ्ता दरगाह आला हजरत यांनी फतवा काढला होता. शरियत कायद्यानुसार शाहरुख खान गुन्हेगार असल्याचे त्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे शाहरुख आणि गौरी खानला भाड्याने गर्भाशय दिलेल्या महिलाने देखील प्रायश्चित करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच शाहरुख खानवर लिंग परीक्षण केल्याचाही आरोप होत आहे. त्याची चौकशी सुरु आहे.