आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vaishya Mahasamelan Branch Will Open In Honkong And New York

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैश्य महासंमेलनाची शाखा हाँगकाँग, न्यूयॉर्कमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनाची (आयव्हीएफ) परदेशातील पहिली शाखा हाँगकाँगमध्ये स्थापन होणार आहे. 24 ऑगस्टला शाखेचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी आयव्हीएफचे संस्थापक रामदास अग्रवाल व वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष तथा दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ हाँगकाँगला जात आहे.

आयव्हीएफचे सरचिटणीस बाबूराम गुप्ता यांनी ही माहिती दिली. शिष्टमंडळात आयव्हीएफचे कार्यकारी अध्यक्ष, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष, गोल्ड सूक ग्रुपचे चेअरमन सुरेंद्र गुप्ता, आयव्हीएफचे सरचिटणीस व मध्य प्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता, सरचिटणीस बाबूराम गुप्ता, विदेश विभागाचे सरचिटणीस रजनीश गोयंका, संयुक्त सरचिटणीस व मध्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गोविंद गोयल, संयुक्त सरचिटणीस व उद्योगपती बृजेश गुप्ता, समस्त भारतीय पार्टीचे अध्यक्ष सुदेश अग्रवाल, दुबईचे प्रसिद्ध व्यावसायिक नीलकमल अग्रवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष व उद्योगपती अशोक अग्रवाल, सत्यभूषण जैन, अजय गुप्ता, अमित गुप्ता यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ 24 ऑगस्टला हाँगकाँगला पोहोचेल आणि सायंकाळी हॉटेल काउलून संग्रिलामध्ये हाँगकाँग चॅप्टरची स्थापना करेल. हाँगकाँगहून अशोक मुंदडा, विनोद धारीवाल, मुकेश अडकिया, अजय जाकोटिया, सोहन गोयंका, रमेश सावरथिया यांनी वैश्य महासंमेलनाची स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे.

31 रोजी अमेरिकेत
जयपूरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या महासंमेलनाच्या पहिल्या बैठकीत परदेशी शाखा स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. एक वर्षात तीन शाखा स्थापण्याचा संकल्प करण्यात आला होता. अग्रवाल याच महिन्यात थायलंडला गेले होते. आता शिष्टमंडळासह हाँगकाँगला जात आहेत आणि 31 ऑगस्टला अमेरिकेला जाणार आहेत. बाबूराम गुप्ता म्हणाले, परदेशातील वैश्य समाजातील नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे इतर देशांतही शाखा सुरू होऊ शकतात.