आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vajpayee\'s Niece Karuna Shukla Joins Congress, Slams Modi, News In Marathi

निष्ठा संपल्या, संधिसाधूपणा सुरू; पासवान भाजपसोबत, वाजपेयींची पुतणी काँग्रेसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / पाटणा - लोकसभा निवडणूक तोंडावर येताच पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. गुरूवारी जनता दल संयुक्तने आपल्या पाच खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवानंद तिवारी देखील त्यात समाविष्ट आहेत. ते राष्ट्रीय जनता दलाच्या वाटेवर आहेत. दुसरीकडे राजदचे सहकारी राहिलेले रामविलास पासवान यांनी भाजपसोबत युती केली आहे. रात्री उशिरा भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यासंबंधी घोषणा केली. भाजपच्या खासदार करूणा शुक्ला काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत. करूणा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी आहेत. करुणा शुक्ला यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे खासदार जगदंबिका पाल भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. सध्या मी मतदारसंघात आहे. परंतु काँग्रेसकडून दुखावल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एक दिवस अन् चार घटनाक्रम
1. नितीश यांच्याकडून कठोर निर्णय
जनता दल संयुक्तचे सदस्य शिवानंद तिवारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर दोषारोप ठेवला होता. राजदच्या फुटीला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गुरुवारी नितीश यांनी शिवानंद यांच्यासह पाच बंडखोर खासदारांचे पक्षातून निलंबन केले. चार लोकसभा आणि एका राज्यसभेच्या सदस्याचा त्यात समावेश आहे. शिवानंद तिवारी (राज्यसभा), पुरणमासी राम, मंगनीलाल मंडल, सुशीलकुमार सिंह, जयनारायण निषाद अशी निलंबित खासदांची नावे आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई झाली.

2. पतिधर्म न निभावणारा राष्ट्रधर्म काय निभावणार?
करुणा शुक्ला यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती; परंतु गुरुवारी त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. त्यानंतर त्या म्हणाल्या, भाजपने अशा व्यक्तीला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवडले आहे, ज्याने पतिधर्माचे पालन केले नाही आणि राजधर्म पाळला नाही, असा व्यक्ती राष्ट्रधर्माचे काय पालन करणार?

3. मोदी धर्मनिरपेक्षच : लोजपला साक्षात्कार
रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष आणि भाजपसोबत युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. भाजपनेते रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी आणि शाहनवाज हुसेन सकाळी पासवान यांच्या निवास्थानी धडक ले. तासभर खलबते झाली. त्यानंतर रविशंकर प्रसाद म्हणाले, चांगली बोलणी झाली. आम्ही मिठाईसुद्धा खाल्ली. परंतु बिहारमध्ये सात जागा लोजपला देण्यात येणार आहेत. भाजप उर्वरित 33 जागा लढवणार आहे. गुरुवारी रात्री ही घोषणा करण्यात आली.

4. टीआरएसच्या खासदार विजयाशांती काँग्रेसमध्ये
तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदार विजयाशांती यांनी स्वतंत्र राज्याची निर्मिती होताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणची मागणी पूर्ण झाली म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संपूर्ण टीआरएस पक्षाचेच निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा आहे.

... आणि विविध शक्यता
1. जगदंबिका पाल भाजपमध्ये
उत्तर प्रदेशचे एक दिवस मुख्यमंत्रिपद उपभोगलेले काँग्रेसचे नेते जगदंबिका पाल भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध शक्यतांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, मी कॉँग्रेसमध्ये नाराज आहे, मात्र मी अद्याप भाजपशी चर्चा केली नाही. मी सध्या माझ्या भागात असून दिलेली जबाबदारी निभावत आहे.


2. व्ही.के. सिंह शनिवारी भाजपमध्ये
माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह नरेंद्र मोदी यांच्या हरियाणा येथील रेवाडीच्या सभेत सहभागी झाले होते. ते भाजपशी घरोबा करतील अशी शक्यता तेव्हापासून होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शनिवारी ते पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. आतापर्यंत ते अण्णा हजारे यांच्यासोबत होते.

3. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचे 3 मंत्री आणि चार आमदार टीडीपीत
आंध्र प्रदेशमध्ये राज्य विभाजनानंतर विरोध सुरूच आहे. कॉँग्रेसचे 3 मंत्री आणि 4 आमदार तेलगू देसम पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन-चार दिवसांत या संबंधी घोषणा होऊ शकते.