आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Special The Love Symbol Taj Mahal Photo

प्रेमाच्या दिवशी, प्रेमाच्या प्रतिकाचे ताजे PHOTO, दिव्य मराठीच्या वाचकाच्या नजरेतून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगभरात आज १४ फेब्रूवारी हा "व्हेलेंटाईन डे" म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होत आहे. प्रत्येक प्रेमी युगल या दिवसाची अगदी आतूरतेने वाट पाहात असतो. प्रत्येक जोडप्याचा या दिवशीचा काही ना काही प्लान ठरलेला असतो. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करतात. मात्र काही जणांनी हा दिवस जरा हटकेच साजरा करायचा ठरवलेला दिसतोय. दिव्य मराठीच्या नियमित वाचक सचिन रणसुभे यांनी आग्र्यातून आम्हाला ताजमहलाचे ताजे आणि खास फोटो पाठविले आहेत.
ताजमहलाबद्दल असे सांगितले जाते की, एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला आतापर्यंत दिलेली जगातील ही सर्वोत्तम भेट आहे. शहाजहानने आपल्या पत्नीसाठी बांधलेला हा ताजमहाल प्रेमाचे सर्वात सुंदर आणि अद्भूत उदाहरण आहे. ताजमहाल ही वास्तूच अशी आहे की, जो पाहातो तो त्याच्या प्रेमात पडतो. म्हणूनच तर अमेरिकेच्या राष्ट्रपतींना जेव्हा ताजमहाल पाहाता आला नाही, तेव्हा त्यांचाही थोडा हिरमोड झालाच असे म्हणतात. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या फॅमेलीला ताजमहाल समोर बसून फोटो काढता आला नाही अशा बातम्या माध्यमांनी दाखवल्या होत्या. असो, बराक ओबामांचा हिरमोड झाला तर झाला, मात्र आम्ही तुमचा होऊ देणार नाही.
चला तर मग या प्रेमाच्या दिवशी करूयात प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहालची सैर...
पुढील स्लाईडवर पाहा, ताजमहालचे ताजे ताजे फोटो...