आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाख नव्हे 50 हजार लोक होते मोदींच्या रॅलीत, वरूण गांधींकडून भाजपची पोलखोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या कोलकात्यात झालेल्या रॅलीत उपस्थित गर्दीवरून भाजपचे सरचिटणीस वरूण गांधी यांनी पक्षाला घरचाच आहेर दिला आहे. पक्षाचे सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी वरूण गांधी यांनी म्हटले आहे, की कोलकात्यात मोदींच्या रॅलीत सुमारे 50 हजार लोक उपस्थित होते. त्यांनी म्हटले आहे की, मोदींच्या रॅलीत जेवढे लोक सहभागी झाले त्यापेक्षा पक्षाने चारपट अधिक लोक सहभागी झाल्याचे सांगतिले होते. मात्र मोदी आणि पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या भाषणाबाबत विचारले असता वरूण यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वरूण यांनी सांगितले, की मोदींच्या रॅलीत उपस्थित लोकांची संख्या पक्षाने दोन लाख सांगितली आहे. ही चुकीची आहे. या रॅलीत सुमारे 45 ते 50 हजार लोक उपस्थित होते. तसेच रॅली ठीक-ठाक राहिली.
पक्षाचा वेगळाच दावा
भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने वरूण यांच्याकडे पश्चिम बंगालचे प्रभारीपद सोपवले आहे. बुधवारची मोदींची रॅली यशाबाबत विचारले असता त्यांनी 'ओके' असे म्हटले. मोदींची कोलकाता रॅली भव्य का राहिली नाही याचे उत्तर देताना ते म्हणाले, की आपल्याला चुकीची माहिती मिळाली आहे. हे आकडे खरे नाहीत. या रॅलीत दोन लाख नव्हे तर 45 ते 50 हजार लोक उपस्थित होते.
रॅलीत सहभागी झालेल्या संख्येवरून बंगालमधील भाजपचे नेते उत्साहित दिसत होते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथागत राय यांनी म्हटले होते, की या रॅलीत सुमारे तीन लाख लोक मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. तसेच 50 हजार लोकांना ब्रिगेड परेड मैदानात येण्यापासून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रोखले होते. कोलकात्यात मोदींनी प्रथमच रॅली केली. मोदींनीही गर्दीबाबत आकडेवारी फुगवून सांगितली होती. मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते, की दिल्लीत काही लोक थर्ड फ्रंट बनवित असलेल्या नेत्यांनी येथे हेलिकॉप्टरने यावे आणि येथील गर्दी पहावी. मात्र याच मैदानावर तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यांच्या अनेक बड्या रॅली झाल्याचे व त्यात तीन लाखापासून आठ लाखापर्यंत लोक सहभागी झाल्याचा दावा करीत आहेत.
पुढे वाचा, प्रिया दत्तच्या विरोधात भाजपला मुंबईत उमेदवार मिळेना...
महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी जाहीर
नरेंद्र मोदी यांचे भाषण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा टीव्हीवर बघत आहेत, असे चित्र असो... किंवा कोलकतामध्ये मोदींच्या रॅलीत गोळा झालेल्या लोकांची संख्या असो.... भाजपकडून नेहमीच आकडे फुगवून सांगितले जातात. याबद्दल आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया द्या...आमच्या फेसबुक पेजला भेट द्या...