आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Gandhi Blessed With Baby Girl, Latest News In Marathi

भाजपचे खासदार वरुण गांधी यांना प्राप्त झाले कन्यारत्न, नाव ठेवले अनसुया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे चिरंजिव आणि भाजपचे खासदार वरुण गांधी यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. पत्नी यामिनी रॉय चौधरी यांनी दिल्लीतील एका रुग्णालयात आज (सोमवार) एका गोंडस कन्येला जन्म दिल्याची माहिती स्वत: वरुण गांधी यांनी 'टि्वटर'द्वारा दिली.

'परमेश्वराने आमच्या कुटूंबाला एक अनमोल गिफ्ट दिले आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. परमेश्वराचा मी खूप आभारी आहे. कन्येचे नाव 'अनुसया' ठेवले असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. वरुण यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर 'टि्वटर'च्या माध्यमातून ही माहिती दिली. कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांचे चूलत भाऊ आहेत.

वरुण गांधी आणि यामिनी रॉय चौधरी यांचा विवाह 6 मार्च 2011 रोजी झाला होता. यामिनी या एक 'ग्राफिक डिझायनर' आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, वरुण गांधी यांनी 'टि्वटर'वर पोस्ट केलेले पत्र आणि त्याच्या विवाहाची छायाचित्रे...
(फाइल फोटोः वरुण गांधी)