आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या वरुण गांधींनी लीक केली गुप्त माहिती, व्हिसलब्लोअरचे PMO ला पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शस्त्र विक्रेता अभिषेक वर्माविरुद्धच्या चौकशीत व्हिसलब्लोअरची भूमिका बजावणारे सी. एडमंड्स अॅलन यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात वर्माने हनीट्रॅपद्वारे वरुण गांधी यांच्याकडून संरक्षणविषयक अनेक गोपनीय माहिती काढून घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

१६ सप्टेंबर रोजी पीएमओला पाठवलेल्या पत्रात अॅलन यांनी वरुण गांधींना वर्मा ब्लॅकमेल करत असल्याचा अारोप केला आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी अॅलन यांनी पीएमओला अनेक छायाचित्रे व सीडीही पाठवली आहे.

पीएमओने यासंदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने पाठवलेल्या प्रश्नावलीला उत्तर दिले नाही. वरुण गांधी यांनी मात्र हे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे अॅलन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रास सांगितले.
बातम्या आणखी आहेत...