आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी प्रकरणात वसुंधराराजे गोत्यात, राजीनाम्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ जयपूर - ललित मोदी प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजेंंची स्वाक्षरी असलेला दस्ताएेवज काँग्रेसने जाहीर केला. मात्र, वसुंधरांनी राजीनाम्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आधी दस्तऐवजांवर स्वाक्षरीचा इन्कार केला होता.

दुसरीकडे, वसुंधरांनी ललित यांना मदत केल्याची कबुली दिल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. दरम्यान, भाजपच्या चार महिला मंत्र्यांभोवतीच्या वादाचे ढग गडद होत असताना काँग्रेस, "आप'ने त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत ललित मोदींनी ब्रिटनच्या यूके बॉर्डर एजन्सीकडे चार वर्षांपूर्वी दिलेले शपथपत्र उघड केले. त्यावर वसुंधरांची स्वाक्षरी आहे. शपथपत्रात त्या ललित यांच्या साक्षीदार आहेत. तेव्हा त्या राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या.