आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhara Raje Could Come Face To Face With BJP Leaders Amit Shah, Rajnath Singh Today

भाजपही पाठीशी: मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पाठीशी आमदारांचे बळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाले आहेत. मात्र, या प्रकरणी केंद्र सरकार व भाजपमधून मात्र अजूनही काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पंतप्रधानांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे.

या प्रकरणानंतर केंद्र सरकारच्या प्रतिमेवर होत असलेल्या परिणामाविषयी पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात वसुंधरा राजे यांचे नाव आल्यानंतर केंद्रातून काहीही प्रतिक्रिया किंवा बचावाविषयी भाष्य आलेले नाही. यावर काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी म्हटले आहे की, "सुषमा स्वराज यांच्या बचावार्थ समस्त भाजप व संघाचे नेते सरसावले. वसुंधरा राजे यांच्यासाठी मात्र अद्याप कुणीही का पुढे आले नाही?'दरम्यान, भाजप व केंद्र सरकार वसुंधरा राजे यांच्या पाठीशी असल्याचा दावा राजस्थानचे मंत्री राजेंद्र राठोड यांनी केला आहे.दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "मोदी यांनी आता राजकीय विपश्यनेतून बाहेर पडावे. सुषमा स्वराज व वसुंधरा यांनी संगनमताने ललित मोदींना मदत केली होती का, ते सांगावे.'

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व माकप नेते सीताराम येच्युरी, तसेच भाकप नेते डी. राजा यांनीही मोदींनी मौन सोडावे, असे आवाहन केले.

वसुंधरांनी शहांना वेळ मागितलेली नाही
एका वृत्तानुसार, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही. सूत्रांनुसार, वसुंधरा यांची अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली असून ललित मोदी यांच्याशी कौटुंबिक संबंध असले तरी त्यांच्यासाठी कोणतेही चुकीचे निर्णय आपण घेतले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

अपमानास्पद काय?
सुषमा स्वराज यांनी ललित मोदींबाबत घेतलेल्या निर्णयांत अपमानास्पद असे काहीच नाही. कॅन्सर पीडित व्यक्तीला (ललित मोदी यांच्या पत्नी) मदत करण्यावरून घेतलेल्या निर्णयावर एवढी चर्चा होण्याचे कारण नाही, असे केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. त्यांची मुलगी ललित मोदींची वकील असली तरी यात गैर ते काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वास्तविक यूपीए सरकारनेच ललित मोदी यांना देशाबाहेर पडण्यास मदत केल्याचा आरोपही गौडा यांनी केला. आता तीच मंडळी विनाकारण आकांडतांडव करत असल्याचे ते म्हणाले.