आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी प्रकरण: होय, स्वाक्षरी माझीच; वसुंधरा राजीनामा देण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि ललित मोदी - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र - मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि ललित मोदी
नवी दिल्ली - राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भारतीय जनता पक्षातील श्रेष्ठींसमोर ललित मोदींच्या इमिग्रेशन अर्जावर 2011 मध्ये स्वाक्षरी केल्याचे मान्य केले आहे. गुरुवारी संध्याकाळी अनेक न्यूज चॅनल्सनी असा दावा केला आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे, की राजेंना आता राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार. मात्र, पक्षाचे गणित हा कयास मानत नाही. वसुंधरा या राजस्थानमधील मातब्बर नेत्या आहेत. राज्यातील अनेक आमदार त्यांच्या सोबत आहेत.
अशीही माहिती आहे, की पक्षातील वरिष्ठांनीच या प्रकरणावर त्यांचे स्पष्टीकरण मागितले होते. तेव्हा त्यांनी ती स्वाक्षरी मीच केली असल्याचे कबूल केले. मात्र, हे वृत्त समोर आल्यानंतर वसुंधरा राजे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले, की माध्यमांमधील वृत्त खोडसाळपणाचे आहे, राजेंची राजकीय प्रतिमा हनन करण्यासाठी असे तथ्यहिन वृत्त दिले जात आहे. वसुंधरा यांचे माध्यम सल्लागार महेंद्र भारद्वाज म्हणाले, मुख्यमंत्र्यची प्रतिमा खराब करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
काय आहे प्रकरण
ललित मोदी 2010 मध्ये ब्रिटनमध्ये गेल्यानंतर भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला होता. त्यानंतर मोदींना ब्रिटनच्या कनिष्ठ इमिग्रेशन न्यायालयात अपील केले होते. वसुंधरा यांच्यावर आरोप आहे, की त्या ललित मोदींसाठी सीक्रेट व्हिटनेस झाल्या होत्या. त्यांनी त्यावेळी ललित मोदींना इमिग्रेशन देण्याचे समर्थन केले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्याआधारावर मोदींच्या जीवाला भारतात धोका असल्याचे मानत ब्रिटनमध्ये राहाण्याची परवानगी दिली होती. इमिग्रेशनच्या वरिष्ठ ट्रिब्यूनलनेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वसुंधरा यांनी स्वाक्षरी केलेले दस्तऐवज