आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शाहने घेतली वरिष्‍ठांची बैठक, घोटाळ्यातून सावरण्‍यासंदर्भात विचारमंथन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्‍या बैठकीला राजस्थानच्‍या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्‍थित होत्‍या. - Divya Marathi
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्‍या बैठकीला राजस्थानच्‍या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्‍थित होत्‍या.
नवी दिल्ली - संसदेच्‍या पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्‍यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्‍यक्ष अमित शाह यांनी रविवारी वरिष्‍ठ नेत्‍यांची उच्‍च्‍ास्‍तरिय बैठक बोलावली. व्यापमं घोटाळ्यामुळे वादात सापडलेले मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री शिवराजसिंह चौहाण आणि ललित मोदी संबंधांमुळे वादात अडकलेल्‍या राजस्थानच्‍या मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांना या बैठकीसाठी बोलावण्‍यात आले होते.
संसदेच्‍या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष व्‍यापमं घोटाळा आणि ललीत मोदी प्रकरणामुळे भाजपाला कात्रीत पकडण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे. या प्रकरणांमधून सरकारला कसे सावरता येईल यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्‍यात आली आहे. बैठकीला वरिष्‍ठ मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद यांच्‍यासह अनेकांची उपस्‍थिती होती.