आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संबंधांचे’ वय 16 निर्णयात घाई झाली, सुधारणा शक्य : रवी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/जयपूर - संमतीने शारीरिक संबंधांसाठी वयोर्मयादा कमी करण्याच्या मुद्दय़ावर सरकार गोंधळले आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतरही विधेयकातील तरतुदींना अनेक मंत्र्यांचा विरोध असून काँग्रेस खासदारांनीही विरोध दर्शवला आहे. यावर व्यापक चर्चा व्हावी, अशी पक्षाची धारणा आहे. घाईत निर्णय झाला असेल तर त्यात सुधारणा करणे शक्य आहे, असे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी म्हटले आहे.

पक्ष व सरकारमध्ये मतभिन्नता असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांनीही मान्य केले आहे. तर या विषयावर सखोल विचार करण्याची गरज पक्षाचे सरचिटणीस विलास मुत्तेमवार यांनी प्रतिपादित केली. अजून या विषयावर लोकांची मानसिकता घडलेली नाही. शारीरिक संबंधांचे वय 18 असावे, या विचारांचे आज लाखो लोक आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सरळ यातून अंग काढून घेतले. आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. महिला-बालविकास मंत्री कृष्णा तीरथ यांनी मात्र थेट आरोपच केला. कॅबिनेटमध्ये या विषयावर कुणाला बोलू दिलेच नाही, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण विकास राज्यमंत्री लालचंद कटारिया तसेच पीएमओचे राज्यमंत्री नारायणसामी यांनीही प्रतिक्रिया दिली नाही.

सहा तासांत 8 हजार एसएमएस
या मुद्दय़ावर शुक्रवारी नऊ ते दुपारी 3 या वेळेत वाचकांचे जवळपास 8 हजार एसएमएस आले. लोकांचा रोष यावरून दिसतो. आतापर्यंत 11,500 वर एसएमएस आले आहेत. ते सर्व खासदार व केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातील.

कोणत्या विचारांतून सरकार कायदा करत आहे? : काँग्रेस खासदारांचा प्रश्न
राजसमंदचे काँग्रेस खासदार गोपालसिंह शेखावत यांनी थेट सरकारला प्रश्न विचारला. आपण 18 वर्षांच्या वयाच्या सर्मथनार्थ उभे राहू. मतदानाचा अधिकार, वाहन परवान्यासह इतर ठिकाणी व्यक्तीचे वय जर 18 च असेल तर मग येथे वय घटवले जाऊ नये.

देवासचे खासदार सज्जनसिंह वर्मा यांनी म्हटले आहे की, 16 वर्षांची मुले, मुली मानसिकदृष्ट्या परिपक्व नसतात. हा विचार सरकारच्या डोक्यात कुठून आला कळत नाही.

विजयलक्ष्मी साधौ म्हणाल्या, कमी वयात विवाह होऊ शकत नाही मग संबंध कसे राहू शकतात? त्याचे वय कमी का करायचे?

‘दिव्य मराठी’ने देशातील काँग्रेसच्या 70 खासदारांची मते जाणून घेतली. त्यापैकी 40 जणांनी निर्णयाला विरोध केला. तर, उर्वरित 30 जणांनी ‘सरकार लपून-छपून हा कायदा का आणू पाहत आहे. यावर जनतेत चर्चा झाली पाहिजे,’ असे मत व्यक्त केले.

संघ विरोधात, अनेक संघटना रस्त्यावर
केंद्राच्या निर्णयाविरुद्ध राजस्थानातील अनेक संघटना शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. आर्य प्रतिनिधी सभा, जमात-ए-इस्लामी, ऑल सेंट्स चर्च आणि मसिही शक्ती समितीचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबोले यांनी हा निर्णय कायदेशीर किंवा नैतिकदृष्ट्याही योग्य नसल्याचे म्हटले आहे. अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देणारा हा कायदा समाजविरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आपणही हा चुकीचा निर्णय थांबवू शकता
हा आमच्या मुलांचा प्रश्न आहे. त्यामुळे असा कायदा होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव वाढवला पाहिजे. म्हणूनच तुम्ही सरळ राजकीय पक्षांना ई-मेल करा किंवा आम्हाला एसएमएस करा 8082005060 या क्रमांकावर. आपली भावना आम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू. ‘परस्पर संमतीने संबंध ठेवण्यासाठी वयोर्मयादा 16 करण्यास माझा विरोध आहे’ एवढीच भूमिका घ्या, असे आम्ही खासदारांनाही सांगू. आपले नाव आणि शहराचे नाव अवश्य पाठवा.