आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vedanta Resource Owner Anil Agrawal Donating 16 Crores Ruppes, Divya Marathi

वेदांता रिसोर्सेसचे मालक अनिल अग्रवाल करणार १६ हजार कोटींची संपत्ती दान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वेदांता रिसोर्सेसचे मालक अनिल अग्रवाल आपली ७५ टक्के संपत्ती दान करणार आहेत. सध्या त्यांच्याकडे २१,३८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी १६ हजार कोटी रुपये अग्रवाल परिवार दान करणार आहे. भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २४ वा क्रमांक आहे.
लंडन शेअर बाजारात वेदांताच्या लिस्टिंगला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अनिल अग्रवाल यांनी दान देण्याची घोषणा केली आहे. ‘पैसा म्हणजेच सर्वस्व नाही. जे कमावले ते समाजाला परत करावे, अशी इच्छा आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. बिल गेट्स यांच्या भेटीनंतर त्यांनी संपत्ती दानाचा निर्णय घेतला.