आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंकय्या नायडूंची निर्माण भवनला अचानक भेट; अधिकारी गैरहजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी निर्माण भवनला अचानक भेट दिली. अधिकार्‍यांची अनुपस्थिती, इमारत देखभालीच्या दुर्लक्षामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

निर्माण भवनमध्ये गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाचे मुख्यालय आहे. नायडू सकाळी 9 वाजताच तेथे पोहोचले आणि त्यांनी विविध अधिकार्‍यांच्या तसेच त्यांच्या सहायकांच्या कक्षांना भेट दिली. त्यांनी भवनाच्या परिसराचा परिसर फेरफटका मारला तसेच उपाहारगृह आणि स्वच्छतागृहांचीही तपासणी केली. नायडूंनी भेट दिली त्या वेळी अनेक अधिकारी आणि त्यांचे सहायकांचे कक्ष रिकामेच होते. तोपर्यंत ते कार्यालयात पोहोचलेच नव्हते. अनेक ठिकाणी विजेच्या वायर लोंबकळलेल्या होत्या तसेच वापरात नसलेल्या वस्तू खुल्या जागेवर पडून होत्या. फरशीही स्वच्छ केली नव्हती. कॅँटीनमधील स्थितीबाबतही नायडू समाधानी नव्हते, अशी माहिती सरकारी पत्रकात देण्यात आली आहे.

या सर्व प्रकारामुळे नाराज झालेल्या नायडूंनी त्यानंतर नगरविकास विभागाचे सचिव सुधीर कृष्णा आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावून घेतले आणि अधिकार्‍यांची अनुपस्थिती तसेच कामाच्या ठिकाणी होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली.