आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venkaiah Naidu Seeks Opposition Support For Insurance Bill

विमा विधेयकावर काँग्रेस कडे पाठिंब्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - सरकारला चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विमा विधेयक मंजूर करायचे असून संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यासाठी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची मागणी केली आहे. विधेयकाबाबत नव्या व योग्य सूचना स्वीकारल्या जातील, असेही संकेत नायडूंनी दिले आहेत. नायडू म्हणाले की, ‘याविषयी काँग्रेस व इतर पक्षांशी मोकळेपणाने बोलण्यास आम्हाला आनंद वाटेल. अर्थमंत्री अरुण जेटलींसह मी सोमवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेईन. विरोधी पक्षाकडून योग्य सूचना आल्यास सरकार त्यावर विचार करण्यास तयार आहे.’ गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार होते.