आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Venkaiah Naidu, Union Minister Appealed To The Opposition, The Government Prepared To Discuss, Let Parliament Work

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंचे विरोधकांना आवाहन, सरकार चर्चेसाठी तयार, संसदेचे काम होऊ द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : केंद्र सरकार नोटाबंदीसह कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे विरोधकांनी हिवाळी अधिवेशनातील उर्वरित काळात संसदेचे कामकाज चालू द्यावे, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केले.
नायडू म्हणाले की, संसदेत कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. शेवटचे २ ते ३ दिवस त्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे. विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू द्यावे आणि चर्चा करावी, असे आवाहन मी करत आहे. सरकार काहीही करायला तयार आहे, पण विरोधक संसदेचे कामकाज होऊ देत नाहीत. त्याचे कारण त्यांना समजले आहे की नाही, पण आम्हाला मात्र ते कळालेले नाही.
विरोधक पंतप्रधानांनाही संसदेत बोलू देत नाहीत. त्यामुळे त्यांना जाहीर सभेत बोलावे लागत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करून नायडू म्हणाले की, संसदेचे कामकाज सुरळीत सुरू व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या गुरुवारी संसदेचे कामकाज रोखून धरल्याबद्दल टीका केली होती. सभागृह हे धरणे आंदोलनाची जागा नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. अडवाणी यांनीही या पेचाबद्दल सत्तारूढ आणि विरोधी पक्ष या दोघांनाही दोषी ठरवले होते. एवढेच नाही तर कामकाज होत नसल्याबद्दल लोकसभा अध्यक्षा आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्यावरही टीका केली होती.
बंगाल भाजप अध्यक्षाविरुद्ध मुस्लिम धर्मगुरूचा फतवा
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांच्याविरोधात एका मुस्लिम धर्मगुरूने फतवा जारी केला आहे. टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूर-उर-रहमान बरकती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ममता बॅनर्जी या सर्वात जास्त धर्मनिरपेक्ष नेत्या आहेत. त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे घोष यांच्यावर दगडफेक करा आणि त्यांना बंगालबाहेर हाकला, ते बंगालमध्ये राहण्यास लायक नाहीत,
असा फतवा आपण काढल्याचे बरकती यांनी सांगितले. या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली हेही उपस्थित होते. घोष यांनी बरकतींवर टीका केली. आपला देश म्हणजे पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...